दमास्कस – सीरियाची राजधानी दमास्कसच्या बाहेरील भागात अनेक ठिकाणी इस्त्रायली हवाई हल्ले झाले, असे सीरियन लष्कराने शनिवारी सांगितले. इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सच्या बाजूने हे हल्ले झाले, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सीरियातील हवाई सुरक्षा यंत्रणेने काही रॉकेट पाडली. तर जी रॉकेट निर्धारित लक्ष्यावर पडली त्यामुळे काही इमारतींचे नुकसान झाले असे सीरियाच्या लष्करी अधिकार् यांनी म्हटले आहे.
मात्र इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली का नाही, हे समजू शकले नाही. या हल्ल्याबद्दल इस्रायलकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रीया देखील उपलब्ध होऊ शकली नाही.
इस्रायल-हमास युद्ध आणि गेल्या महिन्यात सीरियाच्या सीमेजवळ ईशान्य जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे तीन अमेरिकन सैनिक ठार झाले होते. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना हे हल्ले झाले आहेत.
हल्ल्यांतील एक रॉकेट राजधानीच्या पश्चिमेला एका निवासी इमारतीला धडकले आणि त्यात गैर-सिरियन नागरिकांचा मृत्यू झाला असावा, असे सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले.
परंतु यामध्ये अधिक तपशील दिलेला नाही. शनिवारचा हल्ला हा वर्षाच्या सुरुवातीपासून सीरियाच्या भूभागावर इस्त्रायलीचा दहावा उघड हल्ला होता. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी रफाहमधील पॅलेस्टिनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना केली आहे.
यामुळे आता इस्रायल रफाह या शहरावरही हल्ला करण्याची भीती निर्माण झाली आहे. रफाह या गाझाच्या दक्षिणेकडील अगदी टोकाच्या शहरामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांची सध्या मोठा दाटी झाली आहे. या गर्दीमध्येच हमासच्या दहशतवाद्यांना आश्रय घेता असल्याच्या संशयातून इस्रायलने रफाहमध्येही हवाई हल्ले सुरू केले आहेत.