Mehbooba Mufti Protests Against Israel: इस्रायलने हमासविरोधात केलेल्या सूड कारवाईबाबत अनेक देशांमध्ये निदर्शने होत आहेत. श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी (21 ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी मेहबुबा मुफ्ती हातात पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन दिसल्या. त्यांनी आपल्या अधिकृत X हॅंडलवरील पोस्टमध्ये पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. ‘आमच्या पॅलेस्टिनी बांधवांची कत्तल सुरूच आहे, तर जग दुसरीकडे पाहत आहे’, असे त्यांनी लिहिले असून हातामध्ये पॅलेस्टाईनचा झेडा दिसत आहे.
Our Palestinian brethren continue to be slaughtered while the world looks the other way #FreePalestine_Now pic.twitter.com/FlNw8og2Kv
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 21, 2023
न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लोक ‘इस्रायल गो बॅक…’ च्या घोषणा देताना दिसत आहेत, निदर्शनकर्ते लोक मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनात पॅलेस्टाईनचा ध्वज हातात धरून दिसत आहेत.
गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या अतिरेकी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये अचानक प्राणघातक हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्धाची घोषणा करून कारवाई करण्यास सुरुवात केली. इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले करत आहेत. युद्ध अजून थांबलेले नाही.
#WATCH श्रीनगर: PDP प्रमुख महबूबा मुफ्ती ने फिलिस्तीन का झंडा लेकर फिलिस्तीन के समर्थन में हो रहे प्रदर्शन का नेतृत्व किया। pic.twitter.com/yupj6HfXxa
— ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2023
हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायल ग्राउंड ऑपरेशनची तयारी करत असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. इस्रायलने गाझा सीमेवर आपले सैनिक, रणगाडे आणि चिलखती वाहने मोठ्या प्रमाणात तैनात केली आहेत. जगभरातील काही देश इस्रायल तर काही देश पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेला पाठिंबा देताना दिसत आहेत. भारताने इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच मेहबूबा मुफ्ती यांनी आता पॅलेस्टाईनला समर्थन दिले असल्याचे समोर येत आहे.