नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे एक मंत्री राजकुमार आनंद ( Raaj Kumar Anand) यांनी त्यांच्यावर पडलेल्या ईडीच्या छाप्यानंतर दिल्ली मंत्रिमंडळ आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या पटेल नगर निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. (AAP workers stage protest outside Raaj Kumar Anand’s Delhi residence)
या प्रकरणी प्रतिक्रीया देताना आपचे कायकर्ते अंकुश नारंग म्हणाले कीे, गेल्या चार वर्षांपासून आनंद ‘आप’साठी काम करत आहेत. ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांना त्यांनी अनेक विकास प्रकल्पांची आश्वासने दिली होती. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या मतदारसंघातील लोकांना फसवणूक झाल्याची भावना आहे.
आनंद हे पटेल नगर विधानसभा मतदारसंघातील एक आमदार आहेत ज्यांनी २०२० ची दिल्ली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश रत्न यांचा पराभव करून जिंकली होती.
दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याणसह विविध खाती सांभाळणाऱ्या आनंद यांनी भ्रष्टाचार आणि दलितांना पक्षात प्रतिनिधित्व न दिल्याचा आरोप करत बुधवारी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. केवळ आप कार्यकर्त्यांनीच नव्हे तर त्यांच्या मतदार संघातील नागरीकांनीही आनंद यांच्यावर नाराजी व्यक्त करीत त्यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यावेळी आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.