वॉशिंग्टन – अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ अजून सुरू असला तरी आता इस्त्रायलनेही बायडेन यांच्या विजयला मान्यता देताना त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
इस्त्रायलचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांनी काल मंगळवारी बायडेन यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रथमच शुभेच्छा दिल्या. इस्त्रायल हा देश विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक मानला जातो. पण त्यांनीही जाहीररित्या बायडेन यांचेच अभिनंदन करीत त्यांच्या निवडीला मान्यता दिल्याने ट्रम्प यांची बाजू लंगडी होत चालल्याचे दिसत आहे.
या निवडणुकीत बायडेन हेच विजयी झाले असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अजून ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही. त्यामुळे अमेरिकेत सध्या अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे.