जैसलमेर – जैसलमेर येथे पतीच्या निधनानंतर आपल्या नातेवाईकाशी पुनर्विवाह करण्यास नकार देणाऱ्या महिलेची जीभ आणि नाक कापून टाकण्यात आले.
या प्रकरणी त्याच्या सासुरवाडीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. या पीडितेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या महिलेवर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमधून आलेल्या आरोपीने धारधार शस्त्राने हल्ला चढवला. त्यात तिचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. या महिलेच्या भावाने याबाबतची फिर्याद नोंदवली आहे.
या महिलेचे सहा वर्षापुर्वी लग्न झाले होते. वर्षभरातच तिला वैधव्य आले. तिला वैधव्य आल्यानंतर तिने नातेवाईकाशी विवाह करावा म्हणून तिची नणंद प्रयत्न करत होती. त्याला या महिलेची मान्यता नव्हती.
त्यामुळे तिच्या सासूरवाडीतील मंडळी संतप्त होती. त्यांनी तिचे नाक अणि जीभ कापली. तिचा उजवा हात मोडला. तिला वाचवण्यासाठी मध्ये पडलेली आमची आईही जखमी झाली आहे, असे तिच्या भावाने सांगितले.