ह्रदयद्रावक : आईला करोना झाल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू

तेल अवीव – आईला करोना झाल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची ऱ्हदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना इस्रायलमध्ये घडली आहे. मृत्यू झालेले बाळ हे 36 आठवड्यांचे होते, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाच्या आईला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर शनिवारी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही आठवड्यांपूर्वी देखील अशीच एक घटना समोर आली होती. बाळाच्या आईला करोनाची लागण झाली आणि गर्भनाळेद्वारे बाळाला संसर्ग झाला व त्याचा मृत्यू झाला. हे गर्भ 25 आठवड्यांचे होते.

ही घटना दुर्मिळ समजली जात आहे. संसर्गजन्य आजार विभागाचे डाॅ. ताल ब्रोश यांनी सांगितल्यानुसार, भ्रूण गर्भनाळेच्या माध्यमातून करोना संसर्गाच्या विळख्यात अडकले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची दाट शक्यता आहे.

डाॅक्टर ब्रोश म्हणाले, बाळाच्या आईने जर करोनाची लस घेतली असती तर बाळाला वाचवण्यात यश आले असते. गर्भवती स्त्रियांनी करोनापासून बचावासाठी अधिक काळजी घ्यायला हवी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.