नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात रविवारी मुंबई सिटी एफसी ने बेंगळुरू एफसीचा ३-२ असा पराभव केला. मुंबईकडून सामन्यांच्या निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेमध्ये (९०+४) राॅवलिन बोर्जेजने निर्णायक गोल केला. या विजयासह मुंबई सिटीने बेंगळुरू एफसी च्या विजयरथाला रोखलं आहे.
Late drama at the Kanteerava as @MumbaiCityFC end @bengalurufc's unbeaten start to the season!#BFCMCFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/JyfY33dPEP
— Indian Super League (@IndSuperLeague) December 15, 2019
मुंबई सिटी कडून सुभाशीष बोसने १२ व्या, डिएगो कार्लासने ७७ व्या आणि राॅवलिन बाॅर्जेजने अतिरिक्त वेळेत तिसरा गोल केला.
बेंगळुरू एफसी कडून माटो गार्गिकने ५८ व्या आणि कर्णधार सुनील छेत्रीने ८९ व्या मिनिटाला गोल केला.