1 हजार 22 खटले निकाली
बारामती- येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 14) झालेल्या लोक अदालतीत 4 कोटी 21 लाख 63 हजार 240 रुपयांची वसुली झाली असून तडजोडीत वीज वितरण, ग्रामपंचायत व बॅंकाची 881 प्रकरणे निकाली निघाली तर इतर न्यायालयीन 141 प्रकरणे निकाली निघाली.
बॅंका, ग्रामपंचायत, वीज वितरणच्या 881 खटल्यात 2 कोटी 22 लाख 55 हजार 798 व न्यायालयीन खटल्यात 1 कोटी 99 लाख 7 हजार 442 अशी एकूण 4 कोटी 21 लाख रुपयांची वसुली झाली. मुख्य जिल्हा न्यायाधीश रा. बा. देशपांडे यांच्यासह जिल्हा न्यायाधीश एस. टी. भालेराव, जिल्हा न्यायाधीश बी. एन. आरबाड, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पी. आर. वाघडोळे, न्यायधीश डी. एस. खोत, न्यायधीश ए. जे. बाचुलकर, न्यायधीश ए. जे. गिऱ्हे, न्यायाधीश आय. जी. महादेव कोळी यांच्यासह ऍड. अमित काळे, ऍड. अविनाश एजगार, ऍड. मयूर येवले, ऍड. कोमल शिपकुले पॅनेल जज म्हणून काम पाहिले.
बारामती वकील संघटना व विधी सेवा शिबिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायाधीश रा. बा. देशपांडे यांच्यो मार्गदर्शनाखाली वकील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव रासकर, सचिव श्रीकांत काटे व सर्व सदस्य हे लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.