नवी दिल्ली : ह्रुगो बोमोस आणि फेरान कोरोमिनास यांच्या प्रत्येकी २ गोलच्या जोरावर ‘एफसी गोवा’ संघाने बुधवारी इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या सामन्यात ‘हैदराबाद एफसी’ संघाचा ४-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह गोवा संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
The 1⃣st #HeroISL team to qualify for the semi-finals this season 👉 @FCGoaOfficial!#FCGHFC #LetsFootball pic.twitter.com/W6daLcaqAB
— Indian Super League (@IndSuperLeague) February 5, 2020
सामन्यात एफसी गोवा संघाकडून बोमोस याने १९ व्या आणि ५० व्या मिनिटाला तर कोरोमिनास याने ६४ व्या आणि ८७ व्या मिनिटाला गोल केला. हैदराबाद एफसी संघाकडून मार्सेलिन्हो याने ६३ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
50' Brace for Boumous!
The Frenchman skips past 4⃣ @HydFCOfficial defenders and slots it past Kattimani to extend @FCGoaOfficial's lead.
FCG 2-0 HFC#FCGHFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/Kq9DorbAeW
— Indian Super League (@IndSuperLeague) February 5, 2020
या विजयासह एफसी गोवा संघाने १६ सामन्यात ३३ गुण मिळवित गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावलं आहे. तर, हैदराबाद एफसी संघ ६ गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी कायम आहेत.