तुर्कस्थान – इस्लामिक अतिरेकी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सीरियातील कारवाईत ठार झाल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी केला आहे. इस्लामिक स्टेटने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की त्यांचा माजी प्रमुख अबू हसन अल-हाशिमी अल कुरेशी मारला गेला होता, त्यानंतर अबू हुसैनने त्याची जागा घेतली होती. त्याचे सांकेतिक नाव अबू हुसैन अल कुरेशी असे होते.
अखेर आम्हाला यश मिळाले…
एर्दोगन यांनी सांगितलं की, ISIS प्रमुख अबू हुसैन अल कुरेशी याच्यावर गेल्या काही दिवसापासून आमची नजर होती अखेर त्याला ठार करण्यात आम्हाला यश आले आहे. तुर्की आतापर्यंत दहशतवादी संघटनांशी लढत आला आहे. आणि यापुढेही लढत राहील.
दरम्यान, या दहशतवादी संघटनेकडून तुर्कीवर याआधी अनेकदा हल्ले करण्यात आले होते. आत्तापर्यंत 10 आत्मघातकी हल्ल्यांमध्ये 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर शेकडो जखमी देखील झालेत. 2013 मध्ये तुर्कीने ISIS ला दहशतवादी संघटना घोषित केले. आणि त्यानंतर तुर्कीने या दहशतवादी संघटनेविरोधात मोहीम सुरू केली.