बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे ईशान खट्टरसोबत काम करण्यास उत्सुक होती. तिची ही इच्छा “खाली पीली’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. जेव्हापासून ईशानला “बियॉन्ड द क्लाऊड’मध्ये पाहिले तेव्हापासूनच तिला ईशानबरोबर काम करायचे होते, असे अनन्याने सांगितले.
मला आशा आहे की त्यांच्य कामाची उर्मी माझ्यामध्येही दिसेल. तो एक अतिशय हुशार अभिनेता आहे. आम्ही दोघेही तरूण आहोत आणि तरुण ऊर्जेसह काम करणे चांगले होईल. अनन्याने ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2′ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अनन्या “पति पत्नी और वो’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाशिवाय ती लवकरच ईशान खट्टरसमवेत ‘खाली पीली’ मध्ये देखील दिसणार आहे.
तिला अजूनही रोलची निवड करताना पप्पा चंकी पांडे यांची मदत घ्यावी लागते. याशिवाय बॉलिवूडमधील तिची चांगली मैत्रिण सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्याबरोबर राहूनही तिला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आहेत. अल्पावधीत तिला आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली याबाबत ती स्वतःला भाग्यवान समजते आहे.