संयुक्तराष्ट्रात चीननेही उपस्थित केला काश्‍मीरचा विषय

संयुक्तराष्ट्रे – पाकिस्तानच्या पाठोपाठ चीननेही संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत काश्‍मीरचा विषय उपस्थित केल्याने पाकिस्तानला थोडे नैतिक बळ मिळाले आहे. संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळांचे ठराव आणि द्विपक्षीय करारातील तरतूदींनुसार काश्‍मीर प्रश्‍न सुटला पाहिजे असे चीनने म्हटले आहे. काश्‍मीरातील स्थितीत बदल होईल असा कोणताही निर्णय भारताने परस्पर घेणे योग्य नाही असा अभिप्रायही चीनने व्यक्त केला आहे.

चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत हे मतप्रदर्शन केले. भारताने गेल्या 5 ऑगस्ट रोजी काश्‍मीरचा कलम 370 नुसार मिळालेला विषेश राज्याचा दर्जा नाहींसा करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले आहे. त्यावेळीही चीनने लडाखाच्या बाबतीतील निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.