पुणे – बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवित असते.
View this post on Instagram
तिच्या दिलखेचक अदांनाही चाहत्यांची खूपच पसंती मिळत असते. आता ईशा गुप्ताने पुन्हा नवीन फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ केले आहे.
View this post on Instagram
काळ्या रंगाचा शर्टमध्ये तिने खूपच मोहक पोज दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो पुन्हा व्हायरल झाले आहेत. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक बूटमध्ये ईशा गुप्ताचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या फोटोतील ईशा गुप्ताचा लूक खूपच मनमोहक आहे. यापूर्वी ईशा गुप्ताने तिच्या बेडरूममधील फोटो शेअर केले होते. या फोटोत ती नाईटवेअरमध्ये दिसली होती.
View this post on Instagram
ईशाने असा बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने बऱ्याच वेळा असे फोटो शेअर केलेले आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंट सांगायचे झाल्यास ईशा गुप्ताने “जन्नत 2′ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर रुस्तम, टोटल धमाल, बादशाहों यासारख्या चित्रपटात तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ती अखेरच्या वेळी “वन डे: जस्टिस डेलिवर्ड’ चित्रपटात झळकली होती.