बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स सोशल मीडियावर न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. त्याचवेळी जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी 2024 या वर्षाचे स्वागत करताना काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी एक नोटही शेअर केली आहे, ज्यामध्ये दिवंगत पती दिलीप कुमार आणि आमिर खान यांच्यातील नात्याबद्दल सांगितले. याशिवाय आमिर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित अनेक रंजक किस्सेही उघड केले आहे.
View this post on Instagram
सायरा बानोने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून आमिर खानच्या कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना लिहिले, ‘नवीन वर्षाची सुरुवात एकत्र केली.’ पुढे नोटमध्ये आमिर आणि तिचा दिवंगत पती दिलीप कुमार यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आणि म्हटले,’कॅलेंडरसोबत आयुष्य बदलत राहते, जसजशी वर्षे बदलतात आणि काळ पुढे सरकतो, तसतसा एक नवीन प्रवास सुरू होतो. या सततच्या बदलांमध्ये, एक सातत्य राहते. त्याचप्रमाणे दिलीप साहब आणि माझ्यासाठी आमिरची अपूरणीय उपस्थिती आहे.’
त्या कठीण काळातल्या आठवणी सांगताना सायरा बानो म्हणाल्या,’आमिर काही कठीण काळात माझ्यासोबत आहे. मला आठवते मी दिलीप साहबांचे “द सबस्टन्स अँड द शॅडो” हे आत्मचरित्र तयार करत असताना आमिरने शक्यतो सर्व प्रकारे मदतीचा हात पुढे केला होता. असेच क्षण मला त्यांच्यासारख्या व्यक्तीचे कौतुक करायला लावतात, जो चित्रपटसृष्टीतील चकचकीत आणि ग्लॅमरच्या पलीकडे आहे.’ असं म्हणत त्यांनी सोशलवर इमोशनल पोस्ट शेअर केली.