आनंदनगर पाकिस्तानात आहे काय?

पिंपरी – आनंदनगरमध्ये करोनाचा प्रकोप झाला आहे. दरम्यान, येथील काही नागरिकांना क्वॉरंटाइन करण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग कॅलेजच्या होस्टेलचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याला प्राधिकरणातील काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यावर बोलताना भाजपा नगरसेविका सीमा सावळे यांनी विरोध करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेत आनंदनगर काय पाकिस्तानात आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

आनंदनगरच्या रहिवाशांना क्‍वॉरंटाइन करण्यास विरोध करणाऱ्या प्राधिकरणातील या लोकप्रतिनिधींची भूमिका एक प्रकारे समाजात फूट पाडणारी आहे, असे सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि गोरगरीब जनतेचा अनादर करणारा आहे. आनंदनगरचे रहिवासी हे कष्टकरी आहेत. येथे घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या परिसरात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढली आणि 45-50 पर्यंत गेली.

खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने तात्काळ काही नागरिकांचे अलगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याला सहकार्य करणे हे शहरातील प्रत्येक नागरिकाचे काम आहे. प्रत्यक्षात त्याला विरोध हा करंटेपणा आहे, असे सावळे यांनी म्हटले आहे. आयुक्त हर्डीकर यांना एक निवेदन देऊन प्रशासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सावळे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.