कराड/पाटण (प्रतिनिधी) – कराड तालुक्यात शेणाली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय दोन पुरुष व 35 वर्षीय महिला यांचा करोना अहवाल शनिवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्यक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
पाटण तालुक्यातील एकूण 23 रूग्णांवर कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचार सुरू असून येथील 123 संशयितांना करोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.
शनिवारी पाटण तालुक्यातील 20 तर कराड तालुक्यातील 16 जणांना करोनाची बांधा झाली. मलकापूर 4, म्हासोली 3, उंब्रज 1, वानवाडी 5 आणि शेणोलीच्या 3 जण नव्याने करोनाबाधित झाले आहेत. शेणोली येथे मुंबईवरुन आलेल्या पाच लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यापैकी 60 व 50 वर्षीय दोन पुरुष व 35 वर्षीय महिला यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या घरातील 12 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, पाटण तालुक्यातील बनपुरी येथील 7 शितपवाडी 3, भरेवाडी 1, भालेकरवाडी 1, शिरळ 4, गावडेवाडी 2, गलमेवाडी 1 अशा एकूण 19 रूग्णांचा समावेश होता. त्या अगोदर शिरळ, म्हावशी, चाळकेवाडी, धामणी येथील प्रत्येकी एक अशा एकूण 23 रूग्णांवर सध्या कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत.