इरा नाही आयरा!

बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानची मुलगी इरा खान ही मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. तिची इंस्टाग्रामवर एक मोठी फॅन फॉलोइंगदेखील आहे. परंतु इरा खान ही स्वतःच्या नावाचे योग्य उच्चारण करण्यात येत नसल्याने थोडी अस्वस्थ आहे.

यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने स्वतःच्या नावाचा योग्य उच्चार कसा करायचा हे सांगितले आहे. तसेच जे लोक योग्य उच्चारण करणार नाहीत, त्यांना कडक इशारादेखील दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

आमीर खानची मुलगी इरा व्हिडिओ शेअर करत म्हणाली की, माझे काही मित्र मला नावावरून चिढवत असतात. ते सर्वजण मला इरा अशी हाक मारतात. त्यामुळे मी माझे नाव योग्य पद्धतीने कसे उच्चारण करायचे हे सांगण्याचा निर्णय घेतला आहे. माझे नाव आयरा असे आहे. उदा. आई आणि रा. यानंतर जर कोणी मला इरा म्हणत असेल तर त्याला पाच हजार रुपये जमा करावे लागतील, जे मी महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी देणगी देईन. प्रत्येक जण मला इरा म्हणून बोलवतात. प्रेस, मीडिया आणि आपणा सर्वांसाठी माझे नाव आयरा असे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.