मुंबई – दागीने क्षेत्रातील कंपनी कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ म्हणजे प्राथमिक समभाग विक्री 16 मार्च पासून सुरु होणार असून ही विक्री 18 मार्चपर्यंत चालेल.
याअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या शेअरच्या किमती कंपनीने 86 ते 87 रुपये प्रति शेअर ठरविल्या आहेत. या माध्यमातून कंपनी 800 कोटी रुपये उभा करणार आहे. कंपनी हे पैसे खेळत्या भांडवलासाठी उपलब्ध करणार असल्याचे सांगण्यात आले.
35 टक्के शेअर हे रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. सध्या कल्याण ज्वेलर्स च्या देशभरामध्ये 107 शोरूम आहेत. 21 राज्यात कंपनीचे काम चालते. त्याचबरोबर मध्य-पूर्व आशिया मध्ये कंपनीच्या 30 शोरूम आहेत.