मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व चेन्नई सुपर किंग्ज या सामन्याने टीआरपीचा विक्रम घडवला. या दोन संघांतील सामना स्टार स्पोर्टसशी करारबद्ध असलेल्या डीस्ने हॉटस्टारवर तब्बल एक कोटी प्रेक्षकांनी पाहिला.
या सामन्यात चेन्नईने बेंगळुरूचा 23 धावांनी पराभव करत यंदाच्या स्पर्धेतील पहिलाच विजय नोंदवला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई विरुद्ध बेंगळुरू सामन्यापूर्वी 21 सामने झाले होते. मात्र, हा सामना सुरू असताना एकाच वेळेला जवळपास 1 कोटी क्रिकेटप्रेमींनी डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह पाहिला.
या सामन्याकडे चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील चुरस म्हणून पाहिले गेले. मात्र, कोहली या सामन्यात केवळ एका धावेवर बाद झाल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. तसेच रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी अफलातून खेळी केली.
हे बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीच्या वाट्याला एकही चेंडू आला नाही. त्यामुळे त्याचे चाहतेही निराश झाले. मात्र, असे असले तरीही या सामन्याला प्रेक्षकांची यंदाच्या स्पर्धेतील अन्य सामन्यांपेक्षाही जास्त पसंती मिळाली हा एक विक्रमच म्हणावा लागेल.