मुंबई – आयपीएल 2022 मधील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/0T96z8GzHj #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/11uq5iR8Gv
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
या सामन्यासाठी दोन्ही संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. हैदराबाद संघात तीन आणि दिल्ली संघात चार बदल करण्यात आले आहेत. हैदराबादकडून तीन खेळाडू पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात केन विल्यमसनने कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सीन अॅबॉट यांना संधी दिली आहे. त्याचवेळी दुसरीकडे मनदीप सिंग, रिपल पटेल, खलील अहमद आणि एनरिक नोर्टजे यांचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11 : डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक.