#IPL2020 : दिनेश कार्तिकने नेतृत्व सोडले

आबूधाबी – कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याने अत्यंत अनाकलनीय निर्णय घेत संघाचे नेतृत्व सोडले आहे. अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील निम्मे सामने झाल्यानंतर त्याने ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला असून आता त्याच्या जागी इंग्लंडचा इयान मॉर्गन नेतृत्व करणार आहे. 

शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच कार्तिकने आपला निर्णय जाहीर केल्याने संघ व्यवस्थापनालाही धक्का बसला आहे. फलंदाजी तसेच यष्टीरक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही जबाबदारी सोडत असल्याचे कार्तिकने सांगितले आहे.

गेले दोन वर्षे ही जबाबदारी त्याच्याकडे होती. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासूनच त्याच्या आणि आंद्रे रसेलमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जात होते. तसेच यंदाच्या स्पर्धेत संघाची कामगिरीही खालावलेली होती. कार्तिकने या स्पर्धेच्या इतिहासात 37 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे.
यंदाच्या स्पर्धेत त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली झालेली नव्हती तसेच त्याच्या नेतृत्वावरही टीका होत होती. त्यामुळेच त्याने अचानक हा निर्णय घेतल्याचेही सांगितले  जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.