शारजा – कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर पृथ्वी शाॅ यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 229 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना दिल्ली संघास प्रथम फलंदाजीस दिली. त्यानंतर दिल्लीने 20 षटकांत 4 गड्याच्या मोबदल्यात 228 धावा केल्या.
First game in Sharjah ▶️ Highest @IPL total in Sharjah 🙌
Let’s defend this Dilliwalon 👊#DCvKKR #Dream11IPL #IPL2020 #YehHaiNayiDilli pic.twitter.com/PrhXqmwmAY
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 3, 2020
दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार श्रेयस अय्यरने तूफानी खेळी केली. श्रेय्यसने 38 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 88 धावा केल्या. तर सलामीवीर पृथ्वी शाॅने देखील अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण योगदान दिले. पृथ्वीने 41 चेडूंत ( 4 चौकार आणि 4 षटकार) 66 धावा काढल्या. याव्यतिरिक्त रिषभ पंतने 38(17) आणि शिखर धवनने 26(16) धावा केल्या. शिमरन हेटमायर 7(5) धावा काढून नाबाद राहिला.
कोलकाताचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले. शिवम मावीने 3 षटकात 40 तर पॅट कमिन्सने 4 षटकांत 49 धावा दिल्या. फिरकीपटून व अनुभवी गोलंदाज सुनील नरेनने 2 षटकांत 26 धावा दिल्या. आंद्रे रसेलने 4 षटकांत 29 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. कमलेश नागरकोटीने 3 षटकात 35 धावा देताना 1 गडी बाद केला. वरूण चक्रवथीने सुध्दा 1 गडी बाद केला पण त्याने 4 षटकांत 49 धावा दिल्या.