#IPL2019 : विजयीलय कायम राखण्याचे मुंबईसमोर आव्हान

मुंबई इंडियन्स vs सनरायजर्स हैदराबाद 

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हैदराबाद – आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने समोरच्या संघाला नामोहरम करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर आतापर्यंत संमिश्र कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असून गत सामन्यात मिळवलेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्यास मुंबई इंडियन्स उत्सुक असून सनरायजर्स हैदराबादचा संघ देखील आपली विजयी लय कायम राखण्यास उत्सूक असेल.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या सामन्यापासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे वाभाडे काढत हैदराबादला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली असून कोलकाता विरुद्धचा सामना वगळत हैदराबादचा संघ इतर सर्व सामन्यात विजयी ठरला आहे. त्यातच हैदराबादचे सलामीवीर ऑरेंज कॅप मिळविणाऱ्या फलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. ज्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 4 सामन्यात 264 धावा केल्या आहेत तर जॉनी बेअरस्ट्रोने चार सामन्यात 246 धावा करत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याच बरोबर त्यांच्या मोहम्मद नबीने केवळ दोन सामन्यांमध्ये सहा गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केले आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ आजच्या सामन्यात मुंबईच्या संघापेक्षा जास्त बलाढ्य भासतो आहे.

दुसरीकडे मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यांनी आपल्या चार सामन्यांपैकी दोन सामने गमावले असून दोन सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. त्यातच त्यांच्य सलामीवीरांना बंगळुरू विरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता इतर सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्यांचा संघ सुरुवातीलाच दबावात येताना दिसून येतो आहे.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्याने 29 धावा वसूल केल्या नसत्या तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागण्याची शक्‍यता होती. त्यामुळे हैदराबादच्या संघासमोर विजय मिळवायचा असल्यास मुंबईच्या संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी विभागांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.