काँग्रेस देशाला लुटण्यासाठी निवडणूक लढवते : पंतप्रधानांचा घणाघात

छत्तीसगड : पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराचा धडाका लावला असून आपल्या प्रत्येक सभेद्वारे पंतप्रधान काँग्रेस तथा त्यांच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्तीसगड येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली असून ते म्हणतात, “काँग्रेस आणि भाजपची निवडणूक लढविण्याची करणे वेगवेगळी आहेत. एकीकडे काँग्रेस देशाचा पैसे लुटण्यासाठी निवडणूक लढवते तर दुसरीकडे आम्ही देशाच्या एक एक रुपयाचा योग्य वापर करता यावा यासाठी निवडणूक लढवतो. ते देशाच्या सुरक्षा यंत्रणांना कमजोर बनविण्यासाठी निवडणूक लढवतात तर आम्ही सुरक्षा यंत्रणांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निवडणुका लढवतो.”

यावेळी पंतप्रधान बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यावरून टिप्पणी करताना म्हणाले की, “जर देशामध्ये मजबूत सरकार असेल तर आपण दहशतवादी हल्ल्यानंतर शांत बसत नाही. सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक या कारवाया मजबूत सरकार असल्यानेच करता आल्या असून या कारवायांमुळे आता जगाला आपली भूमिका ऐकून घ्यावी लागते”

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात AFSPA कायद्यात संविधानिक संशोधन घडवून आणण्याबाबत दिल्या गेलेल्या आश्वासनावरून काँग्रेसला टोला लावताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “AFSPA कायदा हा सुरक्षा दलांसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.