पुणे – पुणे शहराचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ गणपतीला गुढीपाडव्यानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणं अर्पण करण्यात आले आहे. व्यंकटेश हॅचरीज चे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे उपरणं दगडूशेठ गणपतीला अर्पण केले आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या उपरण्याची कमतरता होती, मात्र आता ती पूर्ण झाली आहे. ३ किलो सोन्याचे हे उपरणे धरून दगडूशेठ हवालई गणपतीकडे आता १०० किलो सोन्याचे दागिने झाले आहेत. गुढीपाडव्या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हवालई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज मोठया संख्येने भाविक येत आहेत.