IPL Live Cricket Score, GT vs MI Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या सुपर संडेचा दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्द मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. गुजरातचे होमग्राउंड नरेंद्र मोदी मैदानावर होणार हा सामना होणार आहे. त्याच वेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
या सामन्याने दोन्ही संघ हंगामाची सुरुवात करतील. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे असेल, तर युवा शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करेल. मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्या रविवारी त्याचा पूर्वीचा संघ गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना दिसणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार हार्दिक पांड्यानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरात टायटन्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. या सामन्यात टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुड या तीन परदेशी खेळाडूंसोबत मुंबई खेळताना दिसणार आहे.
🚨 Toss Update 🚨@mipaltan won the toss and elected to field against @gujarat_titans
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱
Follow the match ▶️ https://t.co/oPSjdbb1YT
#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/SD45ApFufX
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
दरम्यान, हार्दिक पंड्यावर रोहित शर्माच्या चाहत्यांचा रोष शमविण्याचा जबाबदारी असणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टायटन्सने पदार्पणाच्या मोसमातच विजेतेपद पटकावले होते तर गेल्या वेळी ते उपविजेते होते. मात्र, पंड्या या मोसमात पुन्हा मुंबईत दाखल झाला आणि रोहितच्या जागी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 4 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबई इंडियन्सने 2 सामने जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सने 2 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 218 धावांची आहे, तर गुजरात टायटन्सची मुंबई इंडियन्सविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 233 धावांची आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट..
तुम्ही जिओ सिनेमावर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, चाहत्यांना जिओ सिनेमावर भोजपुरीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल. यासाठी चाहत्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, तुम्ही Jio सिनेमावर मोफत (Free) लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.