Live Cricket Score, RR vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीचा कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 षटकांत पाच गडी गमावून 185 धावा केल्या आणि दिल्लीसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण वाटत होते, तरीही राजस्थानने 20 षटकांत पाच गडी गमावून 185 धावापर्यंत मजल मारली. राजस्थानने 36 धावांच्या स्कोअरवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण अशा परिस्थितीत रियान परागने अर्धशतक झळकावून संघाला संकटातून वाचवले.
Innings Break!
An unbeaten 84*(45) from Riyan Parag powers @rajasthanroyals to 185/5 🔥🔥
Will it be enough for @DelhiCapitals? Find out 🔜
Scorecard ▶️ https://t.co/gSsTvJeK8v#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/C9j2pPtLhN
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
रियान परागने 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. दरम्यान, रविचंद्रन अश्विननेही 19 चेंडूत 3 षटकार लगावत 29 धावांची शानदार खेळी केली. राजस्थानने शानदार फलंदाजी करत शेवटच्या 5 षटकात 77 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 185 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसला आणि केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोस बटलरची बॅट सलग दुसऱ्या सामन्यात शांत राहिली, त्याने केवळ 11 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला सुरुवात निश्चितच मिळाली, पण 14 चेंडूत केवळ 15 धावा करून तो बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रियान पराग यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीने आरआरसाठी निश्चितच पुनरागमन केले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-vs-pakistan-bilateral-series-in-australia/
15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 108 धावा होती, मात्र शेवटच्या 5 षटकांत रियान परागने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात एकूण 77 धावा काढल्या. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरनेही 7 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 14 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात एनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 185 पर्यंत पोहोचली.
दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी घेतल्या विकेट...
दिल्ली कॅपिटल्सची पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केले. खलील अहमदने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 24 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलनेही 4 षटकात केवळ 21 धावा देत 1 बळी घेतला. कुलदीप यादवने 1 विकेट घेतली पण 4 षटकात 41 धावा दिल्या. मुकेश कुमारने शेवटच्या 2 षटकात 30 धावा दिल्या होत्या. ॲनरिक नॉर्टजे सीझनचा पहिला सामना खेळत होता आणि त्याने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावाही दिल्या. त्याने 1 विकेट घेताना 4 षटकात 48 धावा दिल्या.