Indian Premier League 2024 : श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मधुशंका हा दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. मधुशंकाला मुंबई इंडियन्सने 4.60 कोटी रुपयांना खेरदी केले होते. आता त्याच्या आयपीएल 2024 मध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे. दुखापतीमुळे मधुशंका पुनर्वसनावर काम करेल. श्रीलंका क्रिकेटने त्याच्याविषयी माहिती शेअर केली आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई इंडियन्स किंवा आयपीएलकडून मधुशंकाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
वास्तविक, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मधुशंकाला दुखापत झाली. त्याचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे मदुशंकाला सामना संपण्यापूर्वीच मैदान सोडावे लागले. आता श्रीलंका क्रिकेटने त्याच्याविषयी माहिती शेअर केली आहे. श्रीलंका क्रिकेटने ट्विटरवर दिलशान मधुशंका दुखापतीमुळे भविष्यातील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, तो पुनर्वसनावर काम करेल, असे लिहिले आहे.
🚨 Team Updates 🚨
Dilshan Madushanka will not further take part in the ongoing tour as the bowler will return to start rehabilitation work after suffering an injury during the 2nd ODI.
Madushanka, who left the field during the second ODI while bowling, has suffered a left… pic.twitter.com/O3RvhR7oHa
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 17, 2024
मधुशंकाची दुखापत हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे. तो फॉर्मात होता आणि त्याने अनेकदा घातक गोलंदाजी केली होती. मुंबई इंडियन्सने त्याला 4.60 कोटी रुपयांना खरेदी केले. तर मधुशंकाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. हा त्याचा आयपीएलचा डेब्यू सीझन असणार होता. पण आता खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग किंवा मुंबई इंडियन्सकडून अद्याप मधुशंकाबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
मधुशंकाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ती चमकदार होती. त्याने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. या काळात 24 धावांत 3 बळी घेणे ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मदुशंकाने 23 एकदिवसीय सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचे पूर्ण पथक….
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (जीटीकडून ट्रेड केलेले), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, एम. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.