IPL 2024 (MI vs RCB Match 25) : आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर आहे. या मोसमात विष्णूने अद्याप एकही सामना खेळला नव्हता. पण आता तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. मुंबईने त्याच्या जागी हार्विक देसाईला संघात स्थान दिले आहे. हार्विकने भारतीय अंडर-19 संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे.
यष्टिरक्षक फलंदाज विष्णू विनोदच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे या मोसमात तो आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकणार नाही. मात्र, या मोसमात तो आतापर्यंत एकही सामना खेळू शकला नव्हता. गेल्या मोसमातही त्याला केवळ 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या कालावधीत त्यानं 37 धावा केल्या होत्या. विष्णूने 2017 मध्ये 3 सामने खेळले. याशिवाय तो अद्याप आयपीएलमध्ये खेळू शकलेला नाही.
Vishnu Vinod picked up an injury on his left forearm and has been ruled out of the season. Read more 👉 https://t.co/gLrIXv2i62
We wish you a speedy recovery, VV. You’ll be missed in the camp. 🫶#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/rFHL1M4zAe
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी…
विष्णू विनोदने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 28 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत 1040 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. त्याने 53 लिस्ट ए सामन्यात 1773 धावा केल्या आहेत. विष्णूने लिस्ट ए मध्ये 6 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत.
त्याने 61 टी-20 सामन्यात 1591 धावा केल्या आहेत. मुंबईने विष्णू विनोदच्या जागी हार्विक देसाईचा संघात समावेश केला आहे. हार्विक हा भारताच्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम संघाचा भाग आहे. 2018 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यांना तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.