Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024 – नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असला, तरी या जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असल्याचे अनेकदा म्हटले जात होते. पण आता मात्र स्वत: मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकची जागा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागितली. त्यांनी ती जागा तुम्ही घ्या पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असे म्हटले आहे. अमित शहांनी असे म्हटल्याचे मला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले असल्याचा दावाही त्यांनी केला. । Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024
थोडक्यात भुजबळ यांनी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेच असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आपण भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडूणक लढवणार आहोत, या केवळ चुकीच्या बातम्या असल्याचेही म्हटले आहे.
कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार नाही ही बातमी साफ खोटी आणि निराधार आहे. । Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, नाशिकची जागा हवी असले तर घ्या पण छगन भुजबळांना उमेदवारी द्या. या पलिकडे मी फार काही सांगू शकत नाही. त्यामागे काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील. माझ्याकडे कोणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, चर्चा केली नाही किंवा तसे काहीही घडलले नाही, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.