IPL 2024 (LSG vs DC Match 26, Toss & Playing XI upade) : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे दोन्ही संघांमधील सामना खेळवला जाईल. त्याच वेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक ( Lucknow Super Giants elect to bat against Delhi Capitals) जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, अर्शद खानच्या रूपाने प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. घातक गोलंदाज मयंक यादवच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी दिल्लीचा संघ दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. मुकेश कुमार आणि कुलदीप यादव परतले आहेत.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bat against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/1MQFaSJ8my
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
LSG vs DC : दोन्ही संघाची Playing XI खालीलप्रमाणे…
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर.
इम्पॅक्ट सब : कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, मणिमरन सिद्धार्थ, अमित मिश्रा, मॅट हेन्री.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब : झाय रिचर्डसन, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, सुमित कुमार, प्रवीण दुबे.
के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौची स्थिती अजूनही चांगली आहे, पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी आत्तापर्यंत अत्यंत वाईट राहिलेली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आपला पराभवाचा सिलसिला तोडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL मध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. जर आपण दोन्ही संघांच्या अलीकडील गुणतालिकेबद्दल बोललो तर एलएसजीने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 6 गुण आहेत. सध्या संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यासह, संघ दोन गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार असून जो संघ चांगली कामगिरी करेल तो जिंकेल.