IPL 2024 (Live Cricket Score PBKS vs GT) : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुल्लापूर येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. एका बाजूला सलग 3 सामने हरल्यानंतर पुढे आलेला पंजाब आहे, तर दुसऱ्या बाजूला शेवटचा सामना गमावल्यानंतर येणारा गुजरातचा संघ आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आता विजयी मार्गावर परतायचे आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवन अजूनही तंदुरुस्त नसून तो आजच्या सामन्यात पुनरागमन करणार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सॅम करन संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा बाजूनं लागला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Punjab won the toss against Gujarat, chose to bat) आता टाॅस हरल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल.
🚨 Toss Update from Mullanpur 🚨
Punjab Kings win the toss and elect to bat against Gujarat Titans.
Follow the Match ▶️ https://t.co/avVO2pCwJO#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/BbeeC23H4C
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना महाराजा यादविंदर सिंग स्टेडियम, चंदीगड येथे होणार आहे. या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजापेक्षा वेगवान गोलंदाजाची ताकद अधिक दिसते.