Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs DC) : आयपीएल 2024 चा 40 वा सामना आज(बुधवार, 24 एप्रिल) अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चालू हंगामात दिल्ली आणि गुजरात याआधीही आमनेसामने आले होते, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा दिल्लीला आज त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मागील पराभवाचा बदला घेण्याचे आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचे गुजरात टायटन्सचे लक्ष्य असेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजी करेल. शुभमन गिलचा हा 100 वा आयपीएल सामना आहे.
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to bowl against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/48M4ajbLuk#TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/MEtfEYdRdW
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दिल्लीने दोनदा आणि गुजरातने दोनदा बाजी मारली आहे, मात्र गेल्या लढतीत डीसीने बाजी मारली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची मानसिक स्थिती भक्कम असेल.
Sachin Tendulkar 51th Birthday : ‘सचिन’ अन् ’24’ तारीख…! जाणून घ्या…नेमकं काय आहे खास कनेक्शन..?
आयपीएल (IPL 2024) मध्ये गुजरात टायटन्सने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. हा संघ सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्ली संघ 8 व्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 8 सामन्यांत केवळ 3 विजय मिळवले आहेत. दिल्लीने त्यांच्या घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळला तेव्हा त्यांना हैदराबाद (SRH) कडून 67 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, गुजरात टायटन्स विजयी घोडदौड घेऊन मैदानात उतरणार आहे.