Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी ७ मे यादिवशी मतदान होईल. त्या टप्प्यात एकूण १ हजार ३५१ उमेदवार रिंगणात आहेत. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
त्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे जातील. महाराष्ट्रात २५८ उमेदवारांचे भवितव्य त्या टप्प्यात ठरेल. मध्यप्रदेशातील बैतुलमध्ये दुसऱ्या टप्प्यातच मतदान होणार होते.
मात्र, बसप उमेदवाराच्या निधनामुळे आता त्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण २ हजार ९६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
त्यातील १ हजार ५६३ अर्ज छाननीत वैध ठरले. उमेदवारी मागे घेण्याची मुदत सोमवारी समाप्त झाली. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली. गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण २६ जागा आहेत.
त्यापैकी सूरतमधील भाजपच्या उमेदवाराची याआधीच बिनविरोध निवड झाली. उर्वरित २५ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल. त्या जागांसाठी एकूण २६६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.