IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आयपीएल 2024 चा 35 वा सामना आज (20 एप्रिल,शनिवार) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या होम ग्राउंडवर हा सामना खेळणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. त्याआधी 7.00 वाजता टाॅस केला जाईल.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 मध्ये 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. पॅट कमिन्सचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
DC vs SRH : कोणाचं पारडे जड….
आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान,दिल्ली कॅपिटल्स (DC) ने 11 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 12 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. याशिवाय SRH ने DC विरुद्ध 219 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. तर, DC ने SRH विरुद्ध सर्वाधिक 207 धावा केल्या आहेत.
DC vs SRH : पिच रिपोर्ट…
आयपीएलच्या या मोसमातील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे खेळपट्टी हिरवीगार आणि पूर्णपणे ताजी असू शकते. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जात असली तरी आता त्याचे चित्र बदलले आहे. स्टेडियम फार मोठे नाही, त्यामुळे खूप धावा होतात आणि कधी-कधी चौकार-षटकारांची धूम असते. नवीन खेळपट्टी असल्याने फिरकीपटूंना फारशी मदत होणार नसली तरी वेगवान गोलंदाज प्रभावी ठरू शकतात, असे मानले जात आहे. नवीन खेळपट्टी असेल तर काहीतरी नवीन पाहायला मिळेल.
आयपीएलच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 85 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 38 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 46 दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 167 धावांची आहे, तर दुसऱ्या डावाची 152 धावांची आहे.
DC vs SRH : दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सुमीत कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.