हैदराबाद- आयपीएल 2023 चा 47वा सामना आज हैदराबाद विरुद्ध केकेआर असा रंगणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे, कारण जो संघ हा सामना गमावेल तो आयपीएलमधून जवळपास बाहेर होईल. कारण पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास KKR चा संघ 9 पैकी 6 सामने गमावून 8 व्या स्थानावर आहे, तर SRH 8 पैकी 5 सामने गमावून 9 व्या स्थानावर आहे.
जर कोलकाता आजचा सामना हरला तर ते स्पर्धेतून जवळपास बाहेर होतील. कारण आजच्या पराभवानंतर बाकीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांचे फक्त 14 गुण होऊ शकतात. दुसरीकडे हैदराबादचा पराभव झाला तर त्यांच्याही अडचणी वाढणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद –
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक/ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक
कोलकाता नाइट रायडर्स –
जेसन रॉय, रहमानउल्ला गुरगुबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा.