किश्तवाड – जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात लष्कराचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तंत्रज्ञाचा मृत्यू झाला असून पायलट आणि कोपायलट गंभीर असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ऑपरेशनचा एक भाग म्हणून मिशनमध्ये तैनात असलेले ऍडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) ध्रुव मारवाह भागात नदीच्या काठावर कोसळले. या दिवसात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने या भागाचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे लष्कराने एक निवेदन जारी केले आहे.
उधमपूर-आधारित नॉर्दर्न कमांडने एका निवेदनात म्हटले की, ऑपरेशनल मिशनवर असलेल्या आर्मी एव्हिएशन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरने सकाळी 11.15 वाजता तांत्रिक बिघाड झाल्याने जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवारमधील मरुआ नदीच्या काठावर सावधगिरीने लॅंडिंग केले.