हैदराबाद – आयपीएल 2023 चा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्व संघांसाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे अशातच आजचा सामना हा रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगणार असून हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियम वर खेळवला जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद चा संघ हा प्लेऑफ च्या शर्यतीतुन बाहेर पडला असून रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरसाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आरसीबी सध्या 12 सामन्यांत समान गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी त्याला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे विराट कोहली कडून दमदार खेळी आरसीबीच्या संघाला अपेक्षित आहे.त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतय हे बघणं महत्वाचे ठरेल.
असा असेल संघ…
सनरायझर्स हैदराबाद-
एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन आणि उमरान मलिक.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, अनुज रावत, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मायकेल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा