आयपीएल स्पर्धेतील 29 व्या सामन्यामध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हैदराबाद सनरायर्सविरुद्ध यांच्यात होत आहे. महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र, हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एडेन मार्कमच्या नेतृत्त्वात उतरलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत १३४ धावा काढता आल्या. त्यामुळे, धोनीच्या संघामुळे विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
हैदराबादला २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावाच काढता आल्या आहेत.त्यामुळे हैदराबाद चेन्नईसाठी मोठं आव्हान ठेवण्यात अपयशी ठरला आहे. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावा केल्या.तर राहुल त्रिपाठी २१ आणि हॅरी ब्रुकने १८ धावा केल्या आहेत.
रवींद्र जडेजाची जादुई गोलंदाजी –
चेन्नईकडून रविंद्र जडेजाची जादू चालली असून जडेजाने ४ षटकांत केवळ २२ धाव देत तब्बल ३ विकेट घेतल्या. जडेजाच्या गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ अवघ्या १३५ धावांतच तंबूत परतला.आकाश सिंग, महेश किक्षणा आणि मतिशा पार्थिराना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे, हैदराबादला २० षटकांत १३४ धावांवर रोखण्यात आले.आता,चेन्नईला विजयासाठी २० षटकांत १३५ धावांची गरज आहे.