नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच्या अपयशाची मालिका अद्याप खंडित केलेली नाही. स्पर्धेच्या इतिहासात तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणारा हा संघ यंदा मात्र यशाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी मुंबईचे 3 सामन्यात एका विजयासह 2 गुण आहेत. अद्याप तरी मुंबईच्या संघाने म्हणावी अशी कामगिरी करून दाखवली नाही.
आज मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासमोर आहे. दरम्यान, मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही. रोहितची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याच्या जागी आज सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद आहे.
आजचा हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान, आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने संघात काही मोठे बदल केले आहेत. मुंबईने आज ‘अर्जुन सचिन तेंडुलकर’ याला संधी दिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून अर्जुन आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. आजच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकर कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय. तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र, गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं? हे पाहणे म्हणत्वाचे आहे.