IPL 2021 : स्टार खेळाडूंचे भवितव्य धोक्‍यात

चेन्नई  – आयपीएल ( IPL 2021 ) स्पर्धेचा यंदाचा मोसम भारतातच होणार आहे. गेल्या मोसमातत अपयशी ठरलेल्या स्टार खेळाडूंचे भवितव्य येत्या 11 फेब्रुवारीला होत असलेल्या लिलावात स्पष्ट होणार आहे.

गेल्या मोसमातील स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली होती. जगभरात करोनाचा धोका कायम राहिल्यामुळे तसेच अमिरातीत हा धोका अत्यंत अल्प होता त्यामुळे ही स्पर्धा तेथे घेण्यात आली होती. आता हा धोका जवळपास संपूष्टात आला असल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार आहे. त्यासाठी स्पर्धेतील सर्व सहभागी संघांनी आपापल्या संघातील खेळाडूंची अदलाबदली तसेच करारमुक्ती यांबाबत आयपीएल समितीकडे यादी सुपूर्द केली असून लवकरच लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंची नावे समोर येणार आहेत. त्यात स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्‍सवेल यांच्यासह अनेक स्टार खेळाडूंनाही लिलाव प्रक्रियेतून जावे लागणार आहे. 

लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. यात काही संघांनी धक्कादायक निर्णय घेतले. राजस्थानच्या संघाने स्टीव्ह स्मिथला संघाबाहेर केले. मुंबईने नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिन्सन या दोघांना करारमुक्त केले. पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्‍सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, पंजाबने करारमुक्त केलेला फिरकीपटू मुजीब उर रहमान, कॅमेरुन ग्रीन, मिचेल स्टार्क, काएल जेमीसन, जेसन रॉय व नाथन कुल्टरनाईल अशा अनेक स्टार खेळाडूंचे भवितव्य लवकरच स्पष्ट होणार आहे.

यंदाच्या मोसमासाठी लिलाव 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्या लिलावाआधी अनेक संघ काही खेळाडूंची अदलाबदली करत आहेत. रॉबिन उथप्पाला चेन्नईच्या संघाने राजस्थानकडून ट्रेड केले आहे. लिलावाआधी असे अनेक ट्रेड दिसण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.