आजचे भविष्य ( सोमवार, २५ जानेवारी २०२१)

मेष :  बदलत्या ग्रहमानामुळे तुम्हाला तुमचे निर्णय परिस्थितीनुरूप बदलावे लागतील.

वृषभ : फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन वेळेत पूर्ण करावी लागतील. जमतील तेवढीच कामे करा.

मिथुन : नोकरीत वरिष्ठांचा मानपान सांभाळून कामे करावीत. सहकाऱ्यांकडून मदतीची परतफेड करावी लागेल.

कर्क : घरात रागावर नियंत्रण ठेवून बोलताना शब्द जपून बोला.आप्तेष्ट नातेवाईक यांची सरबराई करावी लागेल.

सिंह : व्यवसायात कामात स्वयंसिद्ध राहून कामे संपवावी लागतील. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील.

कन्या : व्यवसायात आश्‍वासने देताना आपली कुवत ओळखून सावधगिरीने ओशासन दया व ते पाळा.

तूळ : कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. अतिविचार न करता कृतीवर भर राहील.

वृश्‍चिक :  नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्‍तीची विश्‍वासार्हता पडताळून बघा. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

धनु : विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. धावपळ दगदग कमी होईल.

मकर : अनपेक्षित खर्च होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल.

कुंभ : नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल.

मीन : घरात टाळता न येणारे खर्च होतील. तब्येतीची कुरबुर चालू राहील. अतिआत्मविश्‍वास बाळगू नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.