15 हजार रुपयांची मागितली होती लाच
नगर – नगर येथील रेव्हून्यू सोसायटीमधील जातपडताळणी कार्यालयातील अधिकारी 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. जात पडताळणी अधिकारी अविनाश विश्वनाथ मगर यांना ओबीसी (कुणबी) चे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी मगर यांनी केली होती.
त्यानूसार लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, तनवीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमनर, अशोक रक्ताटे त्यांच्या पथकाने मगर यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.