तीन वर्षीय मुलीच्या हत्येचा तपास एसआयटीकडे

अलिगड- उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथील तीन वर्षांच्या मुलीच्या हत्येचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या झाहीद आणि अस्लम या दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अलीगढमधील टप्पल परिसरात राहणारी तीन वर्षांची मुलगी 30 मे रोजी घरातून बेपत्ता झाली होती.

यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 2 जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. मात्र, शवविच्छेदनात मुलीवर बलात्कार झाला नाही, हे स्पष्ट झाले.

मुलीच्या वडिलांसोबत झाहीद आणि अस्लम यांचा पैशांचा वाद होता. या वादातूनच त्यांनी तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सदर प्रकरणी पाच पोलिसांना देखील तपासात दिरंगाई केल्याच्या कारणाने निलंबीत केले आहे. तसेच अलिगड पोलिसांनी घटनेच्या ठिकाणची फॉरेन्सिक नमुने तपासणीसाठी आग्रा येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.