पुणे: हर्बल ऑईल व्यावसायाच्या नावाखाली 21 लाखाचा आर्थिक गंडा घालणाऱ्या नायजेरीन टोळीला आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने खारघर नवी मुंबई येथून अटक केली.
यावेळी 2 लॅपटॉप, बनावट हर्बल आईलच्या पाच बाटल्या,16 मोबाईल, 30 हजाराची रोकड, व डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सूनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे राज्यासह देशभरात देखील गुन्हे केले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
राधा नेल्सन कॅस्टन (वय 37,रा. जुहू मुंबई),अ लेक्स आरिन्झे (वय 33), ग्युयेड फ्रान्सीस (वय 38), ओकोको ओकोरो न्वाआमामा (वय.38), कालू ईलेचूक्ह (27, राहणार सर्वजन मूळ नायजेरीया, सध्या खारघर मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोहगाव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची टणटण या सोशल मडिया अकाऊंटवरून रोज या महिलेशी ओळख झाली होती. तीने महिलेने फिर्यादींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हर्बल ऑईलचा व्यावसाय करण्याच्या बहाण्याने फिर्यादीला जादा नफा कमवीण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादींना त्यातील 40 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. त्याला भुलून फिर्यादीने हर्बल व्यावसाय करण्यासाठी होकार दिला. यानंतर आरोपीने फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणासाठी तब्बल 21 लाख 23 हजार 325 रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यावर वर्ग केले