निमोणे(प्रतिनिधी) – निमोणे (ता. शिरुर) येथील ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परत आली असल्याचे निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी “दै.प्रभात” शी बोलताना सांगितले.
२६ मे रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातून ३ जणांचं कुटुंब निमोणे येथे आल होत. त्यात ४७ वर्षीय व्यक्ती पत्नी आणि मुलाचा समावेश होता. निमोणे ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांनाही जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.३० मे रोजी या ४७ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने आरोग्य खात्याने त्यांना पुणे येथे पाठविले होते. तिथं तपासणी दरम्यान त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर निमोणे गाव व सभोवतालचा परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले असुन १४ दिवस दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण गावातील दुकाने,बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.
त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.कोरोना चाचणीत त्या दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले होते.नुकताच तो ४७ वर्षीय व्यक्ती पूर्णपणे बरा होऊन गावात आला आहे. त्यामुळे निमोणे गाव कोरोना मुक्त झाल्याचे ग्रामसेवक विक्की पोळ व सरपंच बेबीताई भालेकर यांनी सांगितले.