देहूगाव, दि. 1 (वार्ताहर) -तीर्थक्षेत्र देहू नवनिर्मित नगरपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांच्या शनिवारी (दि. 30) बैठक घेत त्यांच्या मुलाखती घेण्यात आली. पक्षाकडे 17 प्रभागासाठी 41 इच्छुक उमेदवारांनी नावे नोंदवली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ऍड कैलास पानसरे, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक साकोरे यावेळी उपस्थित होते.