International Gita Festival – श्रीलंकेत १ मार्चपासून ३ दिवसांचा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोलंबो येथे आयोजित केला जाणार असल्याचे श्रीलंकेचे बुद्धसासन, धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री विदुरा विक्रमनायके यांनी सांगितले. श्रीमद् भगवद्गीतेतील कालातीत शिकवण लोकप्रिय करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या आर्थिक प्रायोजकत्वाने नेलम पोकुना थिएटर परिसरात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात गीता यज्ञ, गीता जप, शोभा यात्रा, आदी अनेक विषयांवर चर्चासत्र आणि अनेक स्पर्धा होणार आहेत.