मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी आता रोज सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली असून महाराष्ट्र सरकारने केलेल्या मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे.

तोपर्यंत प्रत्येक पक्षकारांच्या वकिलांनी लेखी म्हणणे सादर करावे आणि त्यांना युक्‍तिवादासाठी किती वेळ लागू शकतो, याची न्यायालयाला पूर्वकल्पना द्यावी, असे न्यायमूर्ती एल. एन. राव यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी 15 जुलै रोजी सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले.

न्यायालय नियमित सुरू झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.