पुणे -XXX सिझन-2 या वेबसिरीजमधून निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी सैनिकांचा अवमान केल्याचा आरोप शंभू सेनेने केला आहे.
याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष दीपक शिर्के, राम कोरके, आनंद ठाकूर, सुनील काळे, बाबासाहेब जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विमानतळ पोलिसांना देण्यात आले आहे.
संबंधित वेबसिरीजमध्ये एका सैनिकी गणवेशातील व्यक्तीचे आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात आले आहे. या वेबसिरीजवर बंदी आणण्याची मागणीही संघटनेने केली आहे.